शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special: २०२५ मुलींची उपस्थिती; ‘जगातील सर्वात मोठी घराची प्रतिमा’,‘लोकमत सखी’चा जागतिक विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 10:05 IST

लोकमत सखी आणि लोकमत पुणे आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने पुन्हा एकदा विश्वविक्रमाला गवसणी घातली

पुणे : सकाळच्या गुलाबी थंडीत सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थिनी एक एक करून बसमधून उतरत हाेत्या. कोणी लाल टी शर्टमध्ये तर कोणी पिवळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये होत्या. ‘आपण विश्वविक्रमाचे साक्षीदार होणार आहोत’ याबद्दल बसमधून उतरताना मुलींच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद हाेता. ताेच आनंद, तिचं उत्सुकता त्यांच्या शिक्षकांमध्येदेखील दिसली. दुसरीकडे परीक्षकदेखील सज्ज होते. अशा जोशपूर्ण वातावरणात शंभर नव्हे तर तब्बल २०२५ मुली उपस्थित राहून ‘घराची जगातील सर्वात मोठी मानवी प्रतिमा’ साकारत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

लोकमत सखी आणि लोकमतपुणे आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. घराची मानवी प्रतिमा 2025 मुलींच्या सहभागातून तयार करण्यात आली. यावेळी लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, कुमार कॉर्पचे संचालक हितेश केवलकुमार जैन, सूर्यकांत काकडे असोसिएट्सचे संचालक जय सूर्यकांत काकडे व विजय सूर्यकांत काकडे, सहायक उपाध्यक्ष निनाद देसाई, वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.

असा घडला विश्वविक्रम 

लाल, हिरवा, पिवळा, निळा आणि पांढरा या पाच रंगांच्या माध्यमातून मुलींना घराच्या प्रतिकृतीत उभे करण्यात आले होते. यातून घराचा दरवाजा, खिडगी, गार्डन अशा विविध गोष्टींची पूर्तता करत मोठ्या जोशपूर्ण उत्साहात मुलींच्या सहभागाने हा विश्वविक्रम घडला.

विश्वविक्रमातील सहभागी शाळा 

- जयवंत पब्लिक स्कूल, हडपसर- ज्ञानगंगा पब्लिक स्कूल,- खंडोजी बंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, धायरी- नू.म.वि. प्रशाला, पुणे- जाधवर पब्लिक स्कूल, नऱ्हे- रेणुका स्वरूप प्रशाला

लोकमत सखी आणि पुणे लोकमत आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २०२५ साली २०२५ शालेय मुलींच्या सहभागाने मानवी घराच्या प्रतिकृतीचा विश्वविक्रम घडला, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलींचा सहभाग मी पहिल्यांदा पाहिला आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून पुन्हा एकदा पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. ‘लोकमत’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा. - हितेश केवल कुमार, संचालक, कुमार कॉर्प

लोकमतच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात, मात्र हा उपक्रम अनोखा होता. २०२५ या वर्षात २०२५ शाळकरी मुलींच्या सहभागाने ‘लोकमत’ने नवा विश्वविक्रम करत पुन्हा एकदा पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. सातत्याने वेगळे आणि पुण्याला जगाच्या पटलावर ठळकपणे मांडण्याचे काम लोकमत समूह करत आहेत. अशाच विविध उपक्रमांसाठी शुभेच्छा आणि विश्वविक्रमाबद्दल अभिनंदन. - सूर्यकांत काकडे, चेअरमन, सूर्यकांत काकडे असोसिएट्स

लोकमत सखी यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त ‘लोकमत सखी’चा विश्वविक्रम साकार करण्यासाठी आणि विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी शाळेतील मुलींचे विशेष कौतुक. सगळ्यांच्या सहकार्याने विश्वविक्रमाला पुन्हा एकदा ‘लोकमत’ने गवसणी घातली आहे. घराची मानवी प्रतिमा ही संकल्पना खूप वेगळी होती. - डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत समूह.

घर साकारतानाच्या सकारात्मक भावनाच घराला आपलेपण देतात. ‘लाेकमत’च्या पुढाकाराने साकारलेले घर तर मानवी प्रतिमा होते, त्यामुळे आणखीच आपलेपणा दिसून आला. विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठीची मुलींची लगबग, सकाळचे प्रसन्न वातावरणात.. याचा मी ही साक्षीदार हाेऊ शकलाे. त्याबद्दल ‘लोकमत’चे मन:पूर्वक धन्यवाद. वेगळी संकल्पना घेऊन लोकमत कायमचं काम करत असतं. अजून नवनवीन कल्पना अशाच समोर येत राहोत, यासाठी शुभेच्छा. - जय काकडे, संचालक, सूर्यकांत काकडे अँड असोसिएट्स.

लोकमत सखीच्या माध्यमातून कायमच महिलांसाठी विविध उपक्रम राबवीत असते. यंदा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विश्वविक्रम केला. हे ‘लोकमत’च करू शकतं. ‘लोकमत’ने नेहमीच पुण्यासह महाराष्ट्राला जगाच्या पाठीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा महिलादिनी सखींना या विश्वविक्रमातून मानवंदना देण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. - विशाल चोरडिया, संचालक, सुहाना मसाले.

विश्वविक्रम होणं ही खूप आनंदाची बाब आहे. त्याबद्दल ‘लोकमत’ समूहाचे हार्दिक अभिनंदन. लोकमत सखी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना महिलांचा घरातील सहभाग किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करण्यासाठी २०२५ मुलींच्या सहभागाने मानवी घर साकारला गेले. लोकमत सखीच्या माध्यमातून नेहमीच महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातात. ‘लोकमत’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. - युवराज ढमाले, अध्यक्ष, युवराज ढमाले कॉर्प.

‘लोकमत’ने नेहमीच महिलांच्या पुढाकारासाठी काम केले आहे. मग ते ‘ती’चा गणपती असो वा ‘लोकमत सखी’. लोकमत सखी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना ‘घराची जगातील सर्वांत मोठी मानवी प्रतिमा” साकारली. यात विश्वविक्रम केला. याहून अधिक आनंदाची बाब दुसरी असू शकत नाही. लोकमत नेहमीच वेगळेपण जपत आहे आणि या विश्वविक्रमातून ते दिसून आले. - सुशील जाधव, व्यवस्थापकीय संचालक, लोकमान्य सोसायटी.

अनेक उपक्रमांच्या माध्यमातून ‘लोकमत’शी जोडला गेलो. ‘लाेकमत’ने नावीन्यपूर्ण कल्पनांना समोर आणत वेगळेपण जपले आहे. सखी सदस्यांसाठी महिला दिनानिमित्त विश्वविक्रम ही मोलाची भेटवस्तू आहे, असं मला वाटतं. या विश्वविक्रमाचा साक्षीदार मला होता आले त्याबद्दल ‘लोकमत’चे हार्दिक अभिनंदन. ‘लोकमत’ने असेच उपक्रम महिलांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी राबवावेत, अशी आशा व्यक्त करतो. - सुदेश अग्रवाल, संचालक, डब्ल्यू. एस. बेकर्स.

शाळकरी मुलींच्या मदतीने ‘घराची जगातील सर्वांत मोठी मानवी प्रतिमा” साकारणे ही पुण्यासह देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. केवळ महिलांचा सहभाग असलेला, महिला दिनी महिलांनी केलेला विश्वविक्रम सगळ्यांसाठी गर्वाची बाब आहे. - प्रा. डॉ. आनंद काटीकर, कार्यवाह, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे.

'लोकमत'ने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच घराबाहेर पडून स्वतःचे कार्यकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी 'सखी' हे व्यासपीठ खास महिलांसाठी उपलब्ध करून दिले आहे. महिला सबलीकरणाच्या दिशेने उचललेले हे अभिनव पाऊल आहे. त्यासाठी विश्वविक्रम साकारणे ही देखील कौतुकास्पद बाब असून लोकमत समूहाचे हार्दिक अभिनंदन. - हनुमंत गायकवाड, अध्यक्ष, बीव्हीजी ग्रुप. 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतWomen's Day Specialजागतिक महिला दिनSocialसामाजिकStudentविद्यार्थीSchoolशाळाWomenमहिला