बारामती | तरडोलीमध्ये २० वर्षीय विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:14 IST2022-07-04T17:10:16+5:302022-07-04T17:14:30+5:30
मोरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय...

बारामती | तरडोलीमध्ये २० वर्षीय विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू
मोरगाव : बारामती तालुक्यातील तरडोली येथील कोमल अजित तांबे वय वर्षे २० या विवाहित तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. यामुळे मोरगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
बारामती तालुक्यातील तरडोली नजीक तुकाईनगर येथील कोमल अजित तांबे वय वर्ष 20 ही विवाहित तरुणी आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात घरकाम करत असताना तिला सर्पदंश झाला. यानंतर तिला तात्काळ मोरगाव येथील खाजगी रुग्णालयात घालवण्यात आले.
प्राथमिक उपचार केल्यानंतर कोमलची प्रकृती जास्तच ढासळत चालली असल्याने तिला अधिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार करत असताना तिचा मृत्यू झाला. कोमलच्या पश्चात पती, सासू-सासरे, आई-वडील असा परिवार आहे. कोमलच्या मृत्युमुळे तरडोली व मासाळवाडी परिसरातील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.