जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाट्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी - अजित पवार

By श्रीकिशन काळे | Published: December 23, 2023 05:06 PM2023-12-23T17:06:49+5:302023-12-23T17:07:27+5:30

पुणे : जानेवारीमध्ये पिंपरीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० ...

20 lakhs fund for drama conference through District Planning Committee - Ajit Pawar | जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाट्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी - अजित पवार

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाट्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी - अजित पवार

पुणे : जानेवारीमध्ये पिंपरीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनातर्फे १० कोटी रुपये देण्यात येणार आहे. या संमेलनासाठी आमदार निधीतून प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यात येईल. नाट्य संमेलनासाठी मंडप अत्यंत उत्तम दर्जाचा असावा. नाट्य कलावंतांना आवश्यक सर्व सुविधा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात. सर्वांच्या स्मरणात राहील असे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. मंत्री सामंत म्हणाले, संमेलनासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही संमेलनाला सहकार्य करण्यात येईल. यावेळी भोईर यांनी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली.

Web Title: 20 lakhs fund for drama conference through District Planning Committee - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.