Pune Crime: ‘कॉलेजमध्ये बघून का हसलात?’ म्हणत २ विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 18:43 IST2024-03-23T18:42:42+5:302024-03-23T18:43:20+5:30
ही घटना २२ मार्च रोजी सदाशिव पेठ येथील एम.आय.पी.टी. कॉलेज समोर घडली आहे....

Pune Crime: ‘कॉलेजमध्ये बघून का हसलात?’ म्हणत २ विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला
पुणे : कॉलेजमध्ये एकमेकांकडे पाहून हसल्याच्या रागातून चाकूने दोघांवर वार केल्याची घटना सदाशिव पेठेतील एका कॉलेजमध्ये घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या ३९ वर्षीय आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ मार्च रोजी सदाशिव पेठ येथील एम.आय.पी.टी. कॉलेज समोर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि हल्ला करणारे विधिसंघर्षित बालक हे एकाच कॉलेजमध्ये शिकायला आहेत. फिर्यादी यांचा मुलगा आणि त्याचा मित्र जेवणासाठी बाहेर जात असताना अल्पवयीन मुलगा आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून जवळ आले. काल कॉलेजमध्ये बघून का हसत होता? असे विचारून चाकू बाहेर काढून त्याने फिर्यादी यांच्या मुलाच्या मानेवर, पोटावर वार केले. तसेच त्याच्या साथीदाराने मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलाच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.