शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

Video: आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:24 IST

दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे

अवसरी : आंबेगाव तालुक्याचे पुर्व भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. अवसरी खुर्द कौलीमळा येथे गुरुवारी रात्री सात वाजता सुधीर दत्तात्रय भोर ट्रॅक्टर चालवत असताना त्यांना पूर्ण वाढ झालेले दोन बिबटे मुक्तपणे फिरताना दिसले असून त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रीत केला आहे. बिबट्याच्या दहशतीने गावातील मुख्य बाजारपेठेत रात्री सात नंतर सामसूम होते. ग्राहक नसल्याने किराणा दुकानदार अडचणीत आले आहेत. याचबरोबर बिबट्याच्या भितीने शालेय विद्यार्थ्यांना पालक दररोज नेण्यासाठी येत असतात. वनविभागाने तातडीने कौलीमळा येथे पिंजरा लावावा अशी मागणी भाजपचे मेघश्याम भोर यांनी केली आहे.

अवसरी खुर्द गावात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच ओढ्याला बारा माही पाणी वाहत असल्याने बिबट्याला अन्नपानी व लपन क्षेत्र मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढला आहे. बिबट्याने दोन महिन्यापूर्वी सुनील भोर यांच्या चार ते पाच शेळ्या मारून टाकल्या होत्या. नंतर वन विभागाने गणपती कारखान्याजवळ पिंजरा लावला होता. मात्र महिनाभर पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद झाला नाही. मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मधला टेमकर मळा येथील शांताराम टेमकर यांच्या भावाचा मुक्त शेळी गोठ्यात बिबट्याने वीस हजार रुपये किमतीची शेळी मारून टाकली होती. गुरुवार दिनांक ९ रोजी रात्री सात वाजता सुधीर भोर हे शेतात ट्रॅक्टर चालवत असताना त्यांना ट्रॅक्टरच्या लाईटच्या उजेडात दोन बिबटे फिरताना दिसले आहेत. त्यांनी त्यांचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला आहे. दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेघश्याम भोर यांनी केली आहे.

मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अवसरी खुर्द गावात गेले तीन ते चार महिन्यापासून पूर्ण वाढ झालेले बिबटे फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. टेमकरमळा, पंधरा बिघा, कॉलेज रोड, कौलीमळा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्यांनी शेळी, मोटरसायकल चालकांवर हल्ले केले आहेत.  हल्ले केलेल्या शेळी मालकांना नुकसान भरपाई दिली आहे. दोन दिवसात कौलीमळा परिसरात पिंजरा लावला जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Leopards Roam Freely in Ambegaon; Farmer Captures Video

Web Summary : Two leopards freely roam Ambegaon's Avsari area, creating fear. A farmer filmed them. Attacks on livestock have occurred. Villagers demand forest department action and a cage to capture the leopards.
टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावMancharमंचरFarmerशेतकरीforest departmentवनविभाग