पुणे रेल्वे स्थानक परिसरातून २ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत; एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 10:41 PM2021-06-22T22:41:19+5:302021-06-22T22:41:29+5:30

साधु वासवानी रस्त्यावर अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक जण थांबला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली.

2 lakh drugs seized from Pune railway station area | पुणे रेल्वे स्थानक परिसरातून २ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत; एकाला अटक

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून २ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत; एकाला अटक

Next

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले.

इरशाद इक्बाल सय्यद (वय ४२, रा. जनतानगर, गवळीवाडा, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे.

साधु वासवानी रस्त्यावर अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक जण थांबला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा लावून सय्यद याला पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाईल संच असा २ लाख २८ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रवीण शिर्के, मारुती पारधी, पांडुरंग पवार, संदीप जाधव, विशाल दळवी, राहुल जोशी यांनी ही कामगिरी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 2 lakh drugs seized from Pune railway station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app