शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, येरवड्यातील धक्कादायक घटना

By नम्रता फडणीस | Updated: July 16, 2024 16:34 IST

दोन मैत्रिणींनी मद्यपार्टी केली, त्यातील एका १६ वर्षीय मुलीची हि पार्टी अखेरची ठरली

पुणे : येरवडा भागातील दोन १६ वर्षीय मैत्रिणींनी घरी पार्टी केली. मात्र त्यातील एका मुलीची ही पार्टी अखेरची ठरली. तिने गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये तिच्यासमवेत पार्टी करणारी मैत्रीण अतिमद्यसेवनामुळे बेशुद्धावस्थेत सापडली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याने येरवडा पोलिसांकडून तपास सुरु आहे.         तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मद्य पार्टीत तिची मैत्रीण अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला असलेली तनिषा ही महाविद्यालयात अकरावीत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी ( दि. )सायंकाळी दोन मैत्रिणींनी तनीषाच्या घरी मद्य पार्टी केली. तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तिच्या मैत्रिणीने दूरध्वनी करून रात्री आठच्या सुमारास बोलवून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले. तेव्हा तनिषाने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले. त्याने तनिषाला खाली उतरवले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने तनिषाच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तनिषाला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.        बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तिच्या मैत्रिणीला तेव्हा ती मद्याच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई-वडिलांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता तनिषा आणि मैत्रिणींनी मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले. असून, पार्टीनंतर  त्यांनी उलट्या केल्या होत्या. तनीषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणSocialसामाजिकDeathमृत्यूYerwadaयेरवडा