शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी १० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 08:27 AM2024-01-01T08:27:04+5:302024-01-01T08:27:29+5:30

ही घटना २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.....

2 Crore 10 Lakh fraud on the pretext of investment in share market | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी १० लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी १० लाखांची फसवणूक

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला गुंतवणूक केलेली असताना पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यास गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने नकार दिला. त्यानंतर अगोदर गुंतवलेली दोन कोटी १० लाख रुपये रक्कम फ्रीज करत गुंतवणूकदार व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.

विवेक सुभाष डांगे (४५, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वेगवेगळया फोन क्रमांकांवरून बोलणारी जुही आणि चिन्मय गोलेचा, ध्वनी डागा, कस्टमर केअर क्रमांकधारक आणि बँक खातेधारक या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी डांगे यांना एका कंपनीच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देतो, असे आमिष दाखवले. व्हाटसअपवरून लिंक पाठवून डांगे यांना अकाउंट उघडण्यास भाग पाडले. संशयितांच्या सांगण्या प्रमाणे डांगे यांनी दोन कोटी १० लाख ५० हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर संशयितांनी डांगे यांच्या परस्पर केसीईआयएल या कंपनीचे शेअर ॲलॉट झाल्याचे सांगून आयपीओची रक्कम चार कोटी ३३ लाख ५० हजार रुपये भरण्याचा डांगे यांना आग्रह केला. मात्र डांगे यांनी ती ऑर्डर न दिल्याने ते पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर संशयितांनी वेबसाईटवरील वॉलेटवर भरलेली दोन कोटी १० लाख ५० हजार रुपये रक्कम फ्रीज करून ती काढता येत नसल्याचे दाखवत डांगे यांची फसवणूक केली.

Web Title: 2 Crore 10 Lakh fraud on the pretext of investment in share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.