19 years youth death in river at khed taluka | आईला पाच मिनिटात पोहून आलो असं म्हणाला; अन् गेला तो कायमचाच...

आईला पाच मिनिटात पोहून आलो असं म्हणाला; अन् गेला तो कायमचाच...

वाकी बुद्रुक : आईसोबत १९ वर्षीय तरुण मामाच्या गावाला आपल्या नातेवाईकांना भेटायला आला होता. त्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पोहण्याची क्रेझ निर्माण होत आहे. मात्र पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.3)रोजी वाकी बुद्रुक येथे घडली.

कुणाल माणिक पडवळ (वय 19, रा. बोरदरा ता. खेड ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र, दुपारच्यावेळी मामाकडे आला होता. आईला मामाच्या घरी सोडून जेवण करून उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तो वाकी बुद्रुक येथील भामा नदीच्या स्मशानभूमीच्या जवळच्या पात्रात पोहायला गेला होता.

आईला जाताना आई पाच मिनिटात पोहून आलो असं म्हणाला अन पोहायला गेला. त्यानंतर पोहत असताना अचानक नदीपात्रात असलेल्या होडीची धडक त्याच्या डोक्याला लागली अन पाण्यात कुणाल बेशुद्ध झाला. डोक्याला जोराचा मार लागल्याने कुणालचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना कानी पडताच आई अन कुणालचे कुटुंबीय सगळ्यांना अचानक धक्का बसला. पोस्टमन कांतीलाल गारगोटे व महेश गारगोटे यांचा कुणाल भाचा होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 19 years youth death in river at khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.