Pune Corona News: शहरात गुरुवारी १८५ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ४८७
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 22:00 IST2021-09-30T22:00:23+5:302021-09-30T22:00:52+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८४१ संशयितांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: शहरात गुरुवारी १८५ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ४८७
पुणे : शहरात गुरुवारी १८५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८४१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.३५ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ४८७ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८४ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २१८ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३३ लाख ६७ हजार ६४८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यापैकी ५ लाख १ हजार २६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९० हजार ५१० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार २९ जणांचा मृत्यू झाला आहे.