लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर वारंवार केला शारीरिक अत्याचार, मुलगी राहिली गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 14:31 IST2021-04-28T14:30:33+5:302021-04-28T14:31:04+5:30
डोंगरावर नेऊन अत्याचार केल्याचे आले समोर

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर वारंवार केला शारीरिक अत्याचार, मुलगी राहिली गर्भवती
पुणे: घर दाखविण्याचा बहाणा करुन आपण दोघे लग्न करु असे सांगून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार करुन तिला गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बबलु (रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लोहगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२० मध्ये घडला होता.
मुलगी लोहगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना तिची बबलुशी ओळख झाली होती. त्याने घर दाखवितो, असा बहाणा करुन तिला लोहगावमधील खंडोबा माळ डोंगरावर नेले. तेथे तिला आपण दोघे लग्न करु असे सांगून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर आठ दिवसांनी तिला तुला सोन्याची अंगठी करायची आहे, असे सांगून पुन्हा त्या ठिकाणी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. हे आता उघड झाल्यानंतर विमानतळ पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.