आळेफाटा : जुन्नर तालुक्याचे पश्चिम भागातील मांडवे येथून शेतमजुरांना बनकर फाटा येथे घेऊन निघालेली पिकअप गाडी तेथील पुलाजवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात एकूण 17 जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवार (दि 6) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मांडवे येथून बनकरफाटा, ओतूर येथे शेतमजूर मोठ्या संख्येने शेतीच्या कामाच्या शोधार्थ दररोज येत असतात. आज सकाळी मांडवे तेथून या शेतमजुरांना घेऊन निघालेली पिकअप ही तेथून काही अंतरावरच असलेल्या पुलाजवळ सुमारे सात फूट खड्ड्यात पलटी झाली. अपघातात पिकअप गाडी मधून येणारे शेतमजूर आशा रामदास दाभाडे (वय 38) सुधीर बाळू दाभाडे (वय 16) मनीषा किशोर दाभाडे (वय 22) कल्पना मोतीराम उंबरे (वय 30) योगिता साहेबराव दाभाडे (वय 33) झुंबर रोहिदास दाभाडे (वय 35) चंद्रभागा मंगेश बुळे (वय 35) साहिल भीमा दाभाडे (वय 16) करण बुधा दाभाडे (वय 16) सुंदराबाई मारुती दाभाडे (वय 65) आदित्य बाळू दिघे (वय 17) अरुणा बुधा दाभाडे (वय 35) नंदा भिमा दाभाडे (वय 37) सविता अरुण सोनवणे (वय 32) रंजना बाळू दाभाडे (वय 38) निकिता भीमा दाभाडे (वय 19) हे जखमी झाले. दरम्यान ही माहिती मिळतात तेथील युवकांसह ग्रामस्थांनी या सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील दवाखान्यात उपचारासाठी आणले आहे. यातील दोघे दोन ते तीन जणांना अधिकचा मार लागला असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.