शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"तू केस मोकळे सोडत जा..." कामसुत्राचे फोटो दाखवून शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 11:30 IST

ही तरूणी शिक्षकाकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जात होती...

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकांनी 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही तरुणी या शिक्षकाकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जात होती. मात्र "तू केस मोकळे सोडत जा, सुंदर दिसतेस, आय लव्ह यु" म्हणत या शिक्षकाने तिचा विनयभंग केला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निलेश नानासाहेब पवार (वय 49, रा. भगवती नगर सुतारवाडी पाषाण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सोळा वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी हा मुलीचा पेंटिंग टीचर आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पाषाण परिसरात आरोपीचा आर्ट स्टुडिओ आहे. फिर्यादी या आरोपीकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी येत होत्या.  16 नोव्हेंबर रोजी फिर्यादी या स्टुडिओमध्ये एकट्या असताना आरोपीने त्यांच्या पायाला स्पर्श केला. फिर्यादी आपल्या कामात मग्न असताना त्याने स्टुडिओच्या दरवाज्याची कडी लावून घेतली आणि फिर्यादी यांना मोबाईल मध्ये कामसूत्राचे फोटो दाखवले.

त्यानंतर "तू मला खूप आवडते, तू केस मोकळे सोडत जा, मोकळे केस असताना तू खूप सुंदर दिसते" असे म्हणत फिर्यादी यांच्या पायाला आणि गालाला चिमटा घेऊन विनयभंग केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTeacherशिक्षकchatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीसMolestationविनयभंग