शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची चैन चोरली; तिघांना १२ तासांच्या आत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 13:02 IST

तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत

शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) हद्दीत हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करून त्याच्या गळयातील पंधरा तोळे सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तीन चोरट्यांना चाकण पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली आहे. चोरांकडून सोनसाखळीसह ३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीराम संतोष होले (वय २५, रा. होलेवाडी ता. खेड), प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर (वय २१, रा. टाकळकरवाडी ता. खेड) व बबलु रमेश टोपे (वय २३, रा. वाकी बु ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतीश कुंडलीक गव्हाणे (वय ५७, रा. पाटीलवाडी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुळ गावच्या हददीत चाकण - शिकापुर रोडलगत हॉटेल एस. के. येथे तीन अनोळखी चोरटयांनी मोटार सायकलवर येऊन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने मारहाण केली. तसेच फिर्यादी गव्हाणे यांच्या गळ्यातील पंधरा तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरीने हिसकावून चोरटे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चाकण पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.              आरोपींकडून सोन्याची साखळी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान हे आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीPoliceपोलिसbusinessव्यवसायGoldसोनंMONEYपैसा