रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याला पुणे स्टेशनजवळ लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 12:08 IST2018-07-28T11:54:09+5:302018-07-28T12:08:03+5:30
पुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला

रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याला पुणे स्टेशनजवळ लुटले
पुणे - मुंबईहून सोन्याचे दागिने आणणाऱ्या रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर चाकूसारख्या हत्याराने वार करून, सुमारे दीड कोटी किमतीचे दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री पुणे स्टेशनजवळ ही घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय होगाडे हे रांका ज्वेलर्सच्या काळबादेवी येथील कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतात. काल रात्री ते मुंबई येथून 1 कोटी 48 लाख 5 हजार किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन येत होते. त्यावेळी पुणे स्टेशनच्या बाहेर आल्यावर चार अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण करत त्यांच्यावर चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यांच्याजवळील दागिन्यांच्या सॅकमधील दागिने लुटून नेले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर सहाच्या पलीकडे असलेल्या रिक्षास्टँडजवळ ही घटना घडली.