शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा

By नितीश गोवंडे | Updated: March 8, 2025 17:34 IST

गोदामातून १४०० किलो पनीर, १८८० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल जप्त केले

पुणे: शहरात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) आणि पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांच्या पथकाने मांजरीतील एका भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या उत्पादकाच्या कारखान्यात कारवाई केली. या कारवाईत १४०० किलो पनीर, भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी १८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा ११ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मांजरी भागातील एका शेतातील गोदामात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीरचा साठा करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे प्रभारी पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, पोलिस कर्मचारी सचिन पवार, रमेश मेमाणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एफडीएच्या पथकाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर एफडीए आणि पोलिसांच्या पथकाने मांजरीतील माणिकनगर परिसरात असलेल्या गोदामावर छापा टाकला. गोदामातून १४०० किलो पनीर, १८८० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल जप्त केले. पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. भेसळयुक्त पनीरचा साठा पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला.

एफडीएचे सहआयुक्त डाॅ. राहुल खाडे, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, एफडीएतील अधिकारी नारायण सरकटे, बालाजी शिंदे, अस्मिता गायकवाड, सुप्रिया जगताप, एल. डब्ल्यू. साळवे तसेच पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागHealthआरोग्यPoliceपोलिस