मावळ मतदारसंघात १४ मतदान केंद्रे संवेदनशील; अडीच हजार केंद्रांवर पोलिस यंत्रणेचे राहणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:37 PM2024-04-02T18:37:46+5:302024-04-02T18:38:19+5:30

ज्या मतदान केंद्रातील बोगस मतदानाचे अधिक प्रमाण, दादागिरी, भांडणे, शिवीगाळ आदी प्रकारांवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे...

14 polling stations sensitive in Maval Constituency; Police system will focus on 2500 centers | मावळ मतदारसंघात १४ मतदान केंद्रे संवेदनशील; अडीच हजार केंद्रांवर पोलिस यंत्रणेचे राहणार लक्ष

मावळ मतदारसंघात १४ मतदान केंद्रे संवेदनशील; अडीच हजार केंद्रांवर पोलिस यंत्रणेचे राहणार लक्ष

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २५ लाख ९ हजार ४६१ मतदार आहेत. मतदानासाठी २५५६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १४ मतदान केंद्रे संवदेनशील आहेत. सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यावर निवडणूक विभागासह पोलिस यंत्रणेचे विशेष लक्ष असणार आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

ज्या मतदान केंद्रातील बोगस मतदानाचे अधिक प्रमाण, दादागिरी, भांडणे, शिवीगाळ आदी प्रकारांवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे किंवा केंद्रावर एकाच उमेदवाराला ७५ टक्के मतदान झाले आहे किंवा झालेल्या मतदानापैकी ९० टक्के मतदान एकाच उमेदवाराला झाले असल्यास असे मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर केले जाते.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघात ५३८ पैकी ३ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. कर्जत मतदारसंघात ३३९ आणि उरण मतदारसंघात ३४० मतदान केंद्रे असून, तेथे एकही केंद्र संवेदनशील नाही. मावळ विधानसभा मतदारसंघात ३९० पैकी एक केंद्र संवेदनशील आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५४९ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ४ केंद्रांचा समावेश संवेदनशील म्हणून होतो. पिंपरी मतदारसंघात ४०० मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ६ मतदान केंद्रांचा समावेश संवेदनशील म्हणून होतो.

ऑनलाइन प्रक्षेपण

संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाते. त्या केंद्रावर स्वतंत्र निरीक्षक नेमला जातो. त्या केंद्रावरील मतदानावर सीसीटीव्ही कॅमरे लावून वेबकास्ट (ऑनलाइन प्रक्षेपण) केले जाते. विशेष निरीक्षक नेमला जातो. एक अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात केला जातो.

निवडणूक आयोगाकडून आदर्श मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार संवेदनशील मतदान केंद्रांवर उपाययोजना करून अंमलबजावणी केली जाते. तसेच, विशेष अधिकारी नियुक्त करून पोलिस बंदोबस्त वाढविला जातो. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे.

- विठ्ठल जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

Web Title: 14 polling stations sensitive in Maval Constituency; Police system will focus on 2500 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.