शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

पुण्यातील नळस्टॉप चौकात उभा राहणार १४ मीटर रूंदीचा चौपदरी दुहेरी पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:23 PM

पुण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच दुहेरी उड्डाणपूल असणार आहे.

ठळक मुद्देनोव्हेंबर अखेरीस होणार कामाला सुरूवात

पुणे: नळस्टॉप चौकातील महामेट्रोच्या दुहेरी उड्डाण पुलाच्या कामाला नोव्हेंबर अखेरीस सुरूवात होईल. १४ मीटर रूंदीचा हा चौपदरी पूल मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागाला जोडून असेल. पुण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच दुहेरी उड्डाणपूल असणार आहे.

नळस्टॉप चौकातील वाहतुकीवरचा सगळा ताण त्यामुळे कमी होणार आहे. सोनल हॉलपासून तो सुरू होईल व एसएनडीटी महाविद्यालयाच्या थोडे पुढे संपणार आहे. त्याची लांबी साधारण ३५० मीटर आहे. मध्यभागी तो ऊंच असेल व त्याच्या दोन्ही बाजूंना उतार असेल. कर्वे रस्त्याच्या लागून असणार्या जोडरस्त्याने ज्यांंना जायचे नाही असे सर्व वाहनधारक या पूलाचा वापर करतील. मेट्रोच्या खांबांपासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी ७ मीटर रूंदीचा पूल असेल. त्याचे प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार भाग आहेत. प्रत्येक भाग साडेतीन मीटर रूंदीचा आहे. दुचाकी वाहनांसह चार चाकी वाहनांसाठीही पूल खुला असणार आहे. 

जमिनीपासून पूलाची ऊंची ८ मीटर आहे. त्यावर पूल व नंतर पून्हा पुलाच्या वर मेट्रो मार्ग आहे. त्यामुळे वरून मेट्रो धावत असताना या पूलावरून वाहने जातयेत असतील व त्याचवेळी रस्त्यावरही वाहतूक सुरू असेल. मेट्रोच्या खांबांच्या मधून पूलासाठी सध्या जोड काढण्यात आले आहेत. त्यावर गर्डर्स टाकून काँक्रिटचा स्लँब टाकला जाईल. सध्या रस्त्याच्या कडेला गर्डर्स आणून ठेवण्यात आले आहेत. लवकर ते टाकण्याचे काम सुरू केले जाईल. खांबांवर मेट्रो मार्गाचे स्लँब टाकण्याचे सर्व काम रात्री करण्यात आले होते. हेही काम रात्रीच करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. ---/// 

कोरोना टाळेबंदी व त्यामुळे मजुरांची कमतरता यातून मेट्रोच्या एकूणच कामाचे वेळापत्रक बिघडले. आता मजूर परतले असून कामाला गतीही आली आहे. नोव्हेंबर अखेरीस पुलाच्या कामाला सुरूवात होईल. साधारण ६ महिन्यात काम पूर्ण होईल.अतुल गाडगीळ, संचालक ( प्रकल्प) महामेट्रो.---///

महामेट्रो व महापालिका संयुक्तपणे हे काम करत आहे. त्यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने खर्चाचा पहिला ८ कोटी रूपयांचा वाटा दिला आहे. पूलाच्या कामाचे नियोजन महामेट्रोने केले असून पुण्यातील हा सर्वात आकर्षक पूल होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, (जनसंपर्क) महामेट्रो. ---///

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर