शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:20 IST

विमानतळावर स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले

पुणे : सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने गांजा तस्करी रॅकेट पकडले असून पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांकडून १३ किलो ७२५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सीमा शुल्कने चारजणांना अटक करून त्यांच्याकडून गांजाची २६ पाकिटे जप्त केली आहेत.आलिया इलियास अन्सारी (२४), मोहम्मद कैफ अन्सारी (२३, सोनाजीनगर, मुंब्रा), जहिदहुसेन शेख (२९, रा. किल्ला परडी, वलसाड, गुजरात) अणि झैबुनिसा अमिन शेख (४५, रा. धानानी नगर रोड, भोईसर ईस्ट, पालघर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सीमा शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने बँकॉकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या आलिया, मोहम्मद, जहिदहुसेन यांच्याकडे संशयास्पद बॅग आढळली. स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले. त्यात हिरवट रंगाची सुकी वस्तू असल्याचे दिसून आली. त्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या पॅकेट्सचे एकूण वजन १३ किलो ७२२ ग्रॅम आहे. आलिया अन्सारीकडे चौकशी केल्यानंतर विमानतळाबाहेर त्यांचा हॅण्डलर म्हणून जैनबुनीसा शेख थांबल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार जैनबुनीसा हिच्यासह चारही आरोपींना कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. प्राथमिक चौकशीत हे एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास कस्टम विभागाच्या एअर इन्टेलिजन्स विभागाचे प्रिन्स कुमार करत आहे.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाSocialसामाजिक