शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगरपालिकेच्या सर्वेक्षण कामाला दांडी मारणे उपशिक्षकांना भोवले; बारा जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 20:49 IST

पालिकेने शहरात सर्वेक्षण करण्याकरिता जवळपास एक हजार पथके तयार केली आहेत.

ठळक मुद्देगैरहजर शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस हे उपशिक्षक कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अथवा रजेची मान्यता न घेता परगावी 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमलेल्या महानगरपालिकेच्या उपशिक्षकांना कामावर दांडी मारणे चांगलेच भोवले असून अशा तब्बल बारा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या उपशिक्षकांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली असून याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले आहेत. पालिकेने शहरात सर्वेक्षण करण्याकरिता जवळपास एक हजार पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये शिक्षक-उपशिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.

पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षणासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे समन्वयाचे काम देण्यात आले आहे. उपशिक्षकांनी त्यांच्याकडे हजर होणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेच्या ४५ उपशिक्षकांनी कामाला गैरहजेरी लावली. या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. हे उपशिक्षक कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अथवा कोणतीही वैद्यकीय रजा व अर्जित रजेची मान्यता न घेता परगावी गेल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणाच्या कामावर गैरहजर राहिलेल्या ४५ उपशिक्षकांना सर्वेक्षण कामासाठी २४ तासांच्या आत हजर व्हावे अन्यथा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) (क) नुसार निलंबित करण्यात येईल अशी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली होती. नोटीस मिळताच ३२ शिक्षक कामावर हजर झाले. तर एका शिक्षिकेला वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही १२ उप शिक्षक गैरहजर असून त्यांचा कोणताही खुलासा अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही. या शिक्षकांचे वर्तन नियमबाह्य, निष्काळजीपणा व हलगर्जीपणाचे असल्याने या १२ उपशिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या उपशिक्षकांची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

--------

निलंबित उपशिक्षकांची नावे

स्वरदा प्रवीण चव्हाण, निलेश श्रीरंग मोरे, विजया लालासाहेब वाघ, मोहिनी चंद्रकांत मेमाणे, किसन चींधू कवटे, माधवी किशोर घाडगे, केशव गुलाबराव वाघमारे, सुजाता संपत राऊत, राजेंद्र महाद दिवटे, राहुल भागुजी जाधव, शिरीन इसाक मुजावर, चंद्रसिंग अमरसिंग पवार.

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsuspensionनिलंबन