- दीपक कुलकर्णी-पुणे : बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांनी रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर त्यांना सेलिब्रेटी लोकांसोबत फोटो काढण्याचा छंदच जडला..मग ऊन, वारा, पाऊस, दिवस रात्र, नोकरी अशी कशाचीही पर्वा न करता ते आजतागायत फक्त धावताहेत ते मान्यवरांच्या फोटोसाठी.. कधी अपमान,तर कधी सन्मान यांच्या हिंदोळ्यावर हातची नोकरी गमावून देखील ते या छंदापासून दूर गेले नाही.. पण ते आजही स्वत:चा छंद सांभाळून आनंदी आहे.
एक कटू आठवण सांगताना झळकी यांनी सांगितले, सुमन कल्याणपूर ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचा टिळ्रक स्मारक येथे कार्यक्रम होता. त्यादिवशी सकाळपासून त्यांच्यासह फोटो काढायचे मनोमन ठरविले.पण त्यांनी सपशेल नकार देत तुम्ही गाणे ऐकायला आला की फोटो काढायला अशा शब्दांत खरडपट्टी काढली. आजतागायत लता मंगशेकर यांना भेटण्याचा चार ते पाच वेळा योग आला पण त्यांच्यासोबत अद्यापही फोटो आणि सहीच्या प्रतीक्षेत ते आहे. परंतु, याउलट खलनायक म्हणून प्रचलित असलेले रणजित यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो असताना त्यांच्याकडे माज्या अगोदर आलेल्या एका सिनेमा दिग्दर्शकाला थांबवत त्यांनी आम्हांला वेळ दिला. हा माज्यासाठी आश्चयार्चा धक्का होता तर होताच एका खलनायक अभिनेत्याच्या आत वसलेल्या माणसाचे दर्शन घडले. अभय देओल याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी तर तब्बल १३ तास एका खुर्चीवर बसून राहिलो होतो. असे एक ना अनेक प्रसंगांनी छंद जोमात जपण्याचा प्रयत्न करत आहे. अचानक कंपनीतून कमी करण्यात आले तेव्हा कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला. मात्र हार न मानता पुन्हा आपल्या छंदाला व्यावसायिकतेत रुपांतरित करत पूर्णवेळ फोटोग्राफी करण्याचे ठरविले. आता सिनेमाविषयक कार्यक्रम, जुन्या व नव्या गाण्यांवर आधारित संगीत रजनी कार्यक्रमांची फोटोग्राफी करण्याचे काम करतो. तब्बल तीन वेळा सलग तेरा तास फोटोग्राफी केल्याचे ते आवर्जून सांगतात. ...........हल्ली कुठल्याही सेलेब्रिटींचा फोटो काढायचा म्हटलं की दडपण येते. कारण त्यांच्या भोवती असणारे सुरक्षारक्षकांचे कवच त्यांना भेटू देत नाही. पूवीर्चा कलाकारांशी होणारा संवाद कुठेतरी फक्त सेल्फीमध्ये अडकलेला दिसतो. सोशलमीडियामुळे कलाकारांचाही मोकळेपणा दिवसेंदिवस हरवत चालला आहे. सध्या प्रत्येक कलाकार प्रचंड धावपळीत असतो. त्यांच्या पोहचणे ते निघण्यापर्यंतच्या संपूर्ण वेळेची गणित ठरलेले असताना फोटोसाठी मोठी कसरत करावी लागते. पण ही कसरत आणि होणारी धावपळ दूर व्हायला त्या मान्यवर व्यक्तींसोबत मिळणारा एखादा फोटो आणि काहीक्षण पुरेसे ठरतात.- नागण्णा झळकी.