जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: June 17, 2024 02:57 PM2024-06-17T14:57:44+5:302024-06-17T14:58:43+5:30

पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र ...

11 lakh fraud of three in the name of Jammu-Kashmir trip, case registered in Chatu: Shringi police station | जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र संबंधित टूर कंपनीने पैसे घेऊन कोणतीही ट्रिप आयोजित न केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविंद्र बाबाजी शेंडकर (पॅराडाईज हॉलीडे टुर्स, भक्ती प्लाझा, ब्रेमेन चौक, औंध) याच्यावर अभिषेक माणिकराव ननावरे (३७, गुलटेकडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ननावरे यांच्याकडून आरोपीने ७० हजार, राधेय संतोष दगडे यांच्याकडून २ लाख ४० हजार आणि संतोष अरूण राऊत यांच्याकडून ७ लाख ९० हजार ७९७ रुपये घेतले. हा प्रकार १३ फेब्रुवारी ते १६ जून या कालावधीत घडला. मात्र, जम्मू काश्मिरला जाण्यासाठी ठरल्याप्रमाणे सुविधा न देता, ट्रीप आयोजित न करता विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय फिर्यादींनी शेंडकर याला पैशांची मागणी केली असता, त्याने धमकावल्याचे देखील फिर्यादींनी सांगितले. याप्रकरणाचापुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक झरेकर करत आहेत.

Web Title: 11 lakh fraud of three in the name of Jammu-Kashmir trip, case registered in Chatu: Shringi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.