शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

SSC Result 2023:दहावीचा एक तास आधीच निकाल मिळू लागला, पण मंडळ म्हणतं अफवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:57 IST

Maharashtra Board SSC Result 2023 नागरिकांनी अधिकृत वेबसाइटवरून निकाल घ्यावा असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले

अतुल चिंचली 

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर हाेणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले हाेते. अखेर मुहूर्त लागला असून, शुक्रवारी (दि. २) दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना हे पाहता येणार आहे.

परंतु एका माध्यमाच्या वेबसाईटवर निकाल एक तास अगोदर १२ वाजल्यापासून पाहायला मिळत आहे. लोकमतने त्या वेबसाईटवर पाहणी केली असता हि माहिती समोर आली आहे. त्यावरून लोकमतच्या प्रतिनिधींनी शिक्षण अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी हा निकाल फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच नागरिकांनी अधिकृत वेबसाइटवरून निकाल घ्यावा असे सांगण्यात आले आहे. 

राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा दि. २ ते २५ मार्च २०२३ दरम्यान पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नऊ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ लाख ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश हाेता.

राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या निकालाबराेबर इतर सांख्यिकीय माहिती www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध हाेणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत दि. १४ जून राेजी दुपारी ३ नंतर गुणपत्रिका वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल

१. www.mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://ssc.mahresults.org.in

विद्यार्थ्यांना वरील अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येईल. विषयनिहाय किती गुण टक्के मिळाले आहेत हे पाहून गुणांची प्रिंट आउटदेखील घेता येईल.

टॅग्स :PuneपुणेSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षणSocialसामाजिकStudentविद्यार्थी