Pune Corona News: शहरात बुधवारी १०६ जणांची कोरोनावर मात; तर ९५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 18:39 IST2021-11-24T18:39:01+5:302021-11-24T18:39:54+5:30
दिवसभरात ४ हजार ८४२ जणांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: शहरात बुधवारी १०६ जणांची कोरोनावर मात; तर ९५ नवे रुग्ण
पुणे : शहरात बुधवारी ९५ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, १०६ कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४ हजार ८४२ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बधितांची टक्केवारी १.९६ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या १०१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ६९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आतापर्यंत ३६ लाख ५९ हजार ७४२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ६ हजार २०१ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९६ हजार २७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८३६ इतकी आहे.