शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेच्या चारा छावणीत १ हजार जनावरांचा टप्पा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 13:29 IST

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देपाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त : छावणीवरील जनावरांना करणार पाणीपुरवठाबत्तीसाव्या दिवशी १०४७ पर्यंत जनावरे दाखल पावसाच्या लांबणीमुळे अजून जनावरे वाढणार

उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन चारा छावणी सुरू करण्यात आली असून, छावणीत दिवसेंदिवस जनावरांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. बत्तीसाव्या दिवशी १०४७ पर्यंत जनावरे दाखल झाली आहेत. जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे. आज पाऊस पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी होता परंतु पाऊस पडण्याची चिन्हेच दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीत दाखल केली आहेत. छावणीत जनावरांना पशुखाद्य व हिरवा चारा तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने  होत असल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले. जसजसा पाऊस लांबत आहे तस-तसा शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत असल्याने बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील शेतकरी चारा छावणीकडे धाव घेत आहेत. सध्या चारा छावणीत जनावरांचा आकडा १ हजाराच्या पुढे गेला आहे. पावसाच्या लांबणीमुळे अजून जनावरे वाढणार आहेत.

शेटफळगढे : छत्रपतीच्या मदतीला सोनाई धावणार आहे. छावणीवरील जनावरांना पाणीपुरवठा करण्यास मदत करण्याचे सुतोवाच सोनाई परिवाराचे व जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी केले. लाकडी (ता. इंदापूर) येथील छत्रपती कारखान्याने सुरू केलेल्या छावणीला जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी भेट दिली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून पशुधनाच्या दुग्धोत्पादनाची छावणीवर दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. यावर उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर समाधान व्यक्त केले. मात्र, या छावणीत जवळपास दीड हजार जनावरे दाखल झाली आहेत. याला सध्या पाणी कमी पडत आहे. यामुळे आणखी एक टँकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी या वेळी माने यांच्याकडे केली. यावर माने यांनी सोनाई परिवाराच्या वतीने प्रतिदिन २० हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे घोषित केले. यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या वेळी बोलताना  माने म्हणाले, की सध्याचा दुष्काळ हा भीषण आहे. इंदापूर तालुक्यात  छत्रपती कारखाना बाजार समिती तसेच सोनाई परिवार यांनी सुरू केलेल्या छावण्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळाला आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर, दादा वणवे, महेश वणवे, शेतकरी व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळRainपाऊसWaterपाणी