शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:53 IST

बावडा येथून बारामती मार्गे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनात अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती

वालचंदनगर: कळंब (ता. इंदापूर) येथील बी. के. बी. एन. रस्त्यावरील डीपी चौकात महसूल विभाग व वालचंद नगर पोलीसांनी शुक्रवारी(दि ७) पहाटे चार चाकी गाडीचा पाठलाग करत १०० किलो गांजा पकडला. यावेळी केलेल्या कारवाईत गांजा आणि कारसह २९ लाख ९८ हजार पाचशे रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. 

वालचंदनगर पोलिसांनी सांगितले की,  बावडा येथून बारामती मार्गे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनात अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर शिताफीने सापळा रचत कळंब येथील डीपी चौकात होंडा सिटी पकडून त्याची पाहणी केली. यावेळी कारमध्ये २४ लाख ९८ हजार ५०० किंमतीचा गांजा, ५ लाखांच्या कारसह २९ लाख ९८हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे व वालचंदनगर पोलिसांनी हा माल ताब्यात घेतला. कारवाईत ४ आरोपी ताब्यात घेतले असून २ आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींमध्ये  फिरोज अजिज बागवान (वय ३६, रा. कसबा बारामती), प्रदीप बाळासो गायकवाड (वय २८ ,रा. मळद,ता. बारामती) व मंगेश ज्ञानदेव राऊत(वय २९ , रा. मळद) यांचा समावेश आहे. तसेच तीन फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींना इंदापूर येथील न्यायालयाने १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि ८) सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डोनगे यांनी फरार आरोपी अश्रम अजिज सय्यद (वय २९, रा. निरावागज ता. बारामती) याला पकडले आहे.

या टोळीचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंध असून अमली पदार्थ तस्करी बाबतचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण रमेश चोपडे, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे, पोलीस हवालदार गणेश काटकर ,उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार ,शरद पोफळे ,सचिन गायकवाड ,महेश पवार,  अभिजीत कळसकर,गणेश बनकर ,राहुल माने ,ओंकार कांबळे यांनी हि कामगिरी केली.  नागरिकांमध्ये सात आरोपींची चर्चा असताना या गुुन्ह्यात सहा आरोपी असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी दिली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indapur: 100 kg of Ganja Seized, Trafficking Racket Likely Exposed

Web Summary : Police seized 100 kg of ganja and a car worth ₹29.98 lakh in Indapur, arresting four and pursuing two fugitives. An international drug trafficking racket may be uncovered. Further investigation is underway.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसIndapurइंदापूरDrugsअमली पदार्थMONEYपैसा