Corona Vaccination: पुणे शहरात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 21:16 IST2021-09-15T21:15:45+5:302021-09-15T21:16:13+5:30
लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Corona Vaccination: पुणे शहरात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून नव्याने लस आल्या नाहीत. आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेली कोव्हिशिल्ड लस गुरुवारी शहरातील ६० लसीकरण केंद्रांवर वितरित करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी लसीचे १०० डोस दिले जाणार आहेत. दरम्यान कुठंही कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार नसल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२४ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर ३५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.