राज्यातील साडेदहा लाख वीज मीटर नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 15:45 IST2018-04-07T15:45:02+5:302018-04-07T15:45:02+5:30

अचूक बिलींगसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

10 lakh over electric meeters as unrepaired conditions | राज्यातील साडेदहा लाख वीज मीटर नादुरुस्त

राज्यातील साडेदहा लाख वीज मीटर नादुरुस्त

ठळक मुद्देसंजीव कुमार : सदोष वीज मीटर महिनाभरात बदलणारग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास

पुणे : राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर नादुरुस्त आहेत. येत्या महिन्याभरात असे मीटर बदलून त्याची मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करावी असे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आयोजित मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचालन) अभिजित देशपांडे, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्यासह प्रादेशिक व कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता यावेळी उपस्थित होते. 
संजीव कुमार म्हणाले, अचूक बिलींगसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे ३० लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाहीत याची दक्षता घेऊन कार्यवाही करावी. तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार नादुरुस्त वीजमीटर त्वरीत बदलण्यात यावे अशी सूचनाही कुमार यांनी केली.
महावितरणकडून मीटर रिडींग मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरु असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आली आहे. मात्र, मीटर रिडींग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रिडींग घेण्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणला नुकसान सोसावे लागत आहे. असे प्रकार टाळण्यासाठी व बिलींगमध्ये अचूकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात असेही अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कुमार यावेळी म्हणाले. 
महावितरणच्या राज्यातील १६ परिमंडलात नादुरुस्त आढळलेल्या १० लाख ३७ हजार सिंगल फेज वीजमीटरमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १ लाख ८५ हजार, नागपूर प्रादेशिक विभागात २ लाख आणि कोकण प्रादेशिक विभागातील ४ लाख ५३ हजार वीज मीटरचा समावेश आहे. तसेच पुणे प्रादेशिक विभागातील १ लाख ९८ हजार मीटर देखील नादुरुस्त आहेत. हे वीजमीटर बदलण्यासाठी येत्या महिन्याभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

Web Title: 10 lakh over electric meeters as unrepaired conditions