शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

VIDEO: आज मी या देशाला वचन देते की...; उद्धव ठाकरेंवर तोफ डागत कंगनाची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 17:23 IST

मुंबईत येताच कंगनाची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

मुंबई: शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर (Kangana Ranaut's office) कारवाई केली. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून जोरदार टीका केली. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं तिच्या ऑफिसमधील व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. कंगनानं १२ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे. यानंतरच्या एका ट्विटमधून कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. विशेष म्हणजे तिनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ''उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उध्वस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार मोडून पडेल. वेळ नेहमी एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,'' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सकाळी राम मंदिरावरून सरकार लक्ष्य; आता काश्मिरी पंडितांवरील चित्रपटाची घोषणाकंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.  छत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार कधीही बघितलं नाही : देवेंद्र फडणवीसका केली कारवाई? तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन,  स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला.'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी  वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.  Kangana Ranaut critisized on Maharashtra CM Uddhav Thackeray आम्हीच बाबरी तोडणारे, ऑफिसवर कायद्यानुसार कारवाई; संजय राऊतांचा कंगनावर पलटवार

पालिकेच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगितीकंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना