'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 05:06 PM2020-09-09T17:06:53+5:302020-09-09T17:09:50+5:30

कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. या प्रकरणावरुन रेणूका शहाणेने थेट सरकारला सवाल केला आहे 

'Is this drama necessary?' After taking action against Kangana's office, Renuka Shahane targeted the government | 'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. मुंबई पालिकेने कंगनाच्या ऑफिसचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली होती. दरम्यान कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकाम तोडल्याचे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले आहे. मुंबई महापालिकेच्या कारवाईला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती दिली आहे. कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे हिने ट्विटरवर सरकारला सवाल करीत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

रेणूका शहाणेने ट्विट केले की, जरी मला कंगनाचे मुंबईला पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे वक्तव्य रुचले नाही. तरीही सूडभावनेने पालिकेने केलेल्या उद्धवस्तेमुळे मी अस्वस्थ झाले आहे. तुम्हाला इतक्या खालच्या स्तरावर जाण्याची गरज नाही. @CMOMaharashtra कृपया यामध्ये हस्तक्षेप करा. आपण सर्वजण महारोगराईचा सामना करत आहोत. आता या अनावश्यक नाटकाची गरज आहे का?'.


दरम्यान रेणुका शहाणेने याआधी कंगनाने केलेल्या पीओकेच्या मुद्द्यावरून तिला उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे म्हणत खडेबोल सुनावले होते. त्यानंतर कंगना आणि रेणुका यांच्यामध्ये ट्वीटवॉर देखील पाहायला मिळाले होते.

आम्हीच बाबरी तोडणारे, ऑफिसवर कायद्यानुसार कारवाई; संजय राऊतांचा कंगनावर पलटवार


रेणूका शहाणे यांच्याशिवाय सुमीत राघवनने देखील ट्विट करीत मुंबई महापालिकेच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त करत सत्तेचा चुकीचा वापर केल्याचं म्हटलं आहे.

Kangana Ranaut : ...कल तेरा घमंड टुटेगा; उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाचा संताप, Video


मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं तिच्या ऑफिसमधील व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. कंगनानं १२ सेकंदांचं एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.

Web Title: 'Is this drama necessary?' After taking action against Kangana's office, Renuka Shahane targeted the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.