शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशीपासून राफेल व्यवहाराची चौकशी करणार- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 12:23 PM

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी राफेल डीलची चौकशी केली जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी दिली. याचा समावेश काँग्रेसनं जाहीरनाम्यात केल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राफेल डीलचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार आहे. आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराची चौकशी सुरू करू. याचा समावेश आम्ही जाहीरनाम्यात केलेला आहे, असं मुणगेकर यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी थोड्याच वेळात नवी दिल्लीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. यामध्ये अनेक लोकानुनयी घोषणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू होईल. त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकी काय काय आश्वासनं देण्यात आली आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजनेचा समावेश असेल. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपयांची मदत देण्यात येईल. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा फायदा होईल, असा दावा त्यांनी केला होता. सत्तेत आल्यास सहा महिन्यांमध्ये ही योजना लागू करण्यात येईल, असं राहुल यांनी सांगितलं होतं. याशिवाय 22 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचा समावेशदेखील काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असू शकतो. मोदी सरकारच्या काळात भरण्यात न आलेल्या जागा काँग्रेसचं सरकार आल्यावर 31 मार्च 2020 पर्यंत भरण्यात येतील, असं आश्वासन काँग्रेसकडून दिलं जाऊ शकतं. काँग्रेस सत्तेत आल्यास तिहेरी तलाक रद्द करण्यात येईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे याबद्दलच्या आश्वासनाचा समावेशदेखील जाहीरनाम्यात असू शकतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डील