शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे सौम्या वर्मा? जिचं टुलकिट प्रकरणात भाजपाकडून घेतलं जातंय नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:57 IST

Congress Toolkit Case Connection with Saumya Verma: भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टुलकिट प्रकरणामधील सौम्या वर्माूबाबत सनसनाटी दावा केला आहे.

नवी दिल्ली - कोविड-१९ बाबतच्या कथित टुलकिटवरून सुरू झालेला वाद आता वाढू लागला आहे. (Congress Toolkit Case) दरम्यान, याबाबत आज भाजपाने पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले आहेत. ही टुलकिट काँग्रेसने तयार केली. तसेच तिच्या माध्यमातून कोरोनाकाळात राजकीय लाभ घेण्याचा आणि पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, असा दावा भाजपाने केला आहे. (Saumya Verma Connection)

दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ही टुलकिट सौम्या वर्मा हिने तयार केली असून, ती काँग्रेस खासदार एमव्ही राजीव गौडा यांच्या कार्यालयात काम करते, असा दावा केला. भाजपा प्रवक्त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर ट्विटरवर सौम्या वर्मा हे नाव ट्रेंड होऊ लागले आहे.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संबित पात्रा यांनी सौम्या वर्माच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचे काही विवरण आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि गौडा यांच्यासोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच टुलकिटच्या स्रोतांसंबंधीची काही कागदपत्रेही प्रसिद्ध केली आहेत. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये संबित पात्रा यांनी विचारले की, काँग्रेसने काल विचारले होते की टुलकिट कुणी तयार केले आहे? कृपया या पेपरवरील सामुग्री पाहा हे लेखन सौम्या वर्मा हिने केले आहे. हे पुरावे स्वत: सांगताहेत की सौम्या वर्मा कोण आहे ते. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी उत्तर देणार काय?

आम्ही दाखवलेले पुरावे सिद्ध करतात की, सौम्या वर्मा ही एआयसीसीच्या रिसर्च विभागाच्या महत्त्वपूर्ण भाग आहेत. तसेच त्या मुख्य भूमिकेतही असतात. आता सौम्या वर्मा ह्या काँग्रेस कार्यकर्त्या आहेत? त्या एआयसीसीच्या रिसर्च विभागात काम करतात का? त्या राजीव गौडा यांच्या ऑफिसमध्ये काम करतात का त्यांनी हे टुलकिट तयार केले का? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. असे आव्हान पात्रा यांनी दिले. 

दरम्यान, राजीव गौडा यांनी याबाबत सांगितले की, आम्ही पक्षाच्य़ा सेंट्रल व्हिस्टाबाबत एक रिसर्च नोट तयार केली होती. ती योग्य आणि पुराव्यांवर आधारित होती. मी काल ट्विट केले होते की, कोविड-१९ टुलकिट खोटे आहे आणि ते भाजपाने बनवलेले आहे, असे राजीव गौडा म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण