शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

Next Prime Minister: मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला पसंती? शरद पवार की गडकरी? सर्व्हेमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 09:53 IST

Next Prime Minister survey: सर्वेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते पंतप्रधान बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली.

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये जर देशात आज निवडणुका घेतल्या गेल्या तर भाजपाच पुन्हा बहुमताने सत्तेत येईल असे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत, हे देखील समोर आले आहे. परंतू मोदींनंतर पंतप्रधान कोण? यावरही लोकांनी एका नावाला पसंती दिली आहे. 

इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती. आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदी जनतेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहायचे आहे. सध्यातरी लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झालेले पहायचे आहेत. परंतू दुसऱ्या क्रमांकावर किंवा मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान हवेत असे विचारल्यावर लोकांनी योगींच्या नावाला पसंती दिली आहे. योगी आदित्यनाथांना 10 टक्के लोक तर गृहमंत्री अमित शहांना 8 टक्के लोक पंतप्रधानपदी पाहू इच्छित आहेत. यावरून योगींची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून आले आहे. 

सर्व्हेनुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 7 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. तर 5 टक्के लोकांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना 4 टक्के लोकांना पसंती दिली आहे. तर प्रियंका गांधी यांना 3 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. यानंतर मायावती, अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नितीशकुमार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 2-2 टक्के लोकांनीच पंतप्रधानपदी पसंती दिली आहे.  

आजवरचे आवडते पंतप्रधान कोण?सर्वेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते पंतप्रधान बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली. ११ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते पंतप्रधान असल्याचं म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारyogi adityanathयोगी आदित्यनाथUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाNitin Gadkariनितीन गडकरीprime ministerपंतप्रधान