शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? कैलाश विजयवर्गीय यांनी केली महत्त्वाची घोषणा

By बाळकृष्ण परब | Published: January 20, 2021 7:05 PM

west bengal assembly election 2021Update : पश्चिम बंगलच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपा कुणाचे नाव पुढे करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

ठळक मुद्देभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत केली मोठी घोषणा भाजपा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय सामोरा जाणारबहुमत मिळवल्यानंतर पक्षनेतृत्व आणि विजयी आमदार राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेतील

कोलकाता - यावर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत बंगाली मतदारांनी दिलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पार्टीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना फोडून भाजपाने ममता बॅनर्जींना जोरदार धक्के दिले आहेत. आता पश्चिम बंगलच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपा कुणाचे नाव पुढे करणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत घोषणा करताना कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, भाजपा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय सामोरा जाणार आहे. बहुमत मिळवल्यानंतर पक्षनेतृत्व आणि विजयी आमदार राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेतील.पश्चिम बंगालमध्ये यावर्षी एप्रिल-मे या काळात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आपल्याला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाध्यक्ष जेपी नड्डा हे सातत्याने बंगालचा दौरा करत आहेत.२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २११ जागा जिंकल्या होत्या. तर डाव्यांना ३३, काँग्रेसला ४४ आणि भाजपाला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार कामगिरी करत १८ जागांसह ४०.३ टक्के मते मिळवली होती.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण