हे कोणतं ठाकरे सरकार, राष्ट्रवादी फक्त त्यांचा मुखवटा वापरतंय!; देवेंद्र फडणवीसांनी 'हिशेब'च मांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 01:42 PM2021-07-06T13:42:35+5:302021-07-06T13:44:04+5:30

Vidhan Sabha Adhiveshan: नाना पटोले हुशार आहेत. मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना हो ना असे म्हणत फडणवीस म्हणाले की, एकीकडे ऊर्जामंत्र्यांवर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार केला. परंतू, तो दगडच इतका हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

What kind of Thackeray government, NCP is just using their mask!; Devendra Fadnavis allegations | हे कोणतं ठाकरे सरकार, राष्ट्रवादी फक्त त्यांचा मुखवटा वापरतंय!; देवेंद्र फडणवीसांनी 'हिशेब'च मांडला

हे कोणतं ठाकरे सरकार, राष्ट्रवादी फक्त त्यांचा मुखवटा वापरतंय!; देवेंद्र फडणवीसांनी 'हिशेब'च मांडला

Next

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) हे प्रचंड भ्रष्टाचारात गुंतलेले आहे. सरकारमधल्या भ्रष्टाचारावरून आपापसातच जुंपली आहे. नाना पटोलेंनी (Nana Patole letter) यावर पत्र लिहिले आहे. त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. (Devendra Fadanvis allegation on Shiv sena, Congress, NCP.)

Vidhan Sabha Adhiveshan: संधी साधून रवी राणा यांनी राजदंड पळविला; भास्कर जाधव म्हणाले, बाहेर काढा...

नाना पटोले हुशार आहेत. मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना हो ना असे म्हणत फडणवीस म्हणाले की, एकीकडे ऊर्जामंत्र्यांवर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार केला. परंतू, तो दगडच इतका हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, वाझे नाही असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडे जी खाती त्यावर झालेला खर्च ५४ हजार कोटी, काँग्रेसकडे (Congress) जी खाती आहेत त्यावर १ लाख १ हजार कोटी, राष्ट्रवादीकडे (NCP) जी खाती आहेत त्यावरचा खर्च २ लाख २३ हजार कोटी झाला आहे. सर्वाधिक पैसा हा राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांकडे आला आहे.

शिवसेनेला ५० हजार कोटींत गुंडाळले, काँग्रेसला खिरापत दिली लाखाची, आणि जोरात चालू आहे यांचं दुकान, असा आरोप फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. हे कोणतं ठाकरे सरकार, हे राष्ट्रवादीचं सरकार, ठाकरेंचा मुखवटा ते वापरताहेत अशी टीका फडणवीस यांनी केली. 

Web Title: What kind of Thackeray government, NCP is just using their mask!; Devendra Fadnavis allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.