शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

West Bengal Election : "२ मे पर्यंत ममता बॅनर्जींना झालेली दुखापत ठीक होईल, त्या चालत जाऊन आपला राजीनामा देतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 6:37 PM

West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणासध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत.

सध्या पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीममता बॅनर्जी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे सत्तेत येण्यासाठी भाजपनंही पूर्णपणे आपल्याला झोकून दिलं आहे. दरम्यान, रविवारी आयोजित एका रॅलीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "मी अशी अपेक्षा करतो की ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत २ मे पर्यंत ठीक होईल. जेणेकरून त्या राज्यपालांकडे आपला राजीनामा द्यायला जातील तेव्हा त्या आपल्या पायांवर चालत जातील," असं म्हणत त्यांनी टोला लगावला. पहिल्या पाच टप्प्यांमध्ये १८० जागांसाठी मतदान पार पडलं. त्यापैकी १२२ पेक्षा अधिक जागांवर भाजपचाच विजय होईल, असा दावा शाह यांनी केला. तसंच मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या नंदीग्राममधील भाजप उमेदवाराकडून पराभूत होतील. त्यानंतर त्यांना या ठिकाणाहून जावं लागेल, असंही ते म्हणाले. "पाच टप्प्यांतील मतदानानंतर ममता बॅनर्जी निराश आहेत कारण भाजप १२२ जागांवर आघाडीवर आहे. शुभेंदु अधिकारी हेच नंदीग्राममधून निवडणूक जिंकतील. ममता बॅनर्जी यांना पराभवासोबतच रवाना केलं पाहिजे," असंही शाह म्हणाले.  "तुमच्या आणि माझ्यासारखे लोकं दीदींसाठी दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत, जे त्यांच्यासाठी वोटबँक म्हणून महत्त्वाचे नाहीत," असंही शाह म्हणाले. "दीदी म्हणतात की आम्ही सीएए येऊ देणार नाही. तुम्ही काय सीएए थांबवाल. २ मे रोजी तुमची रवानगी निश्चित आहे. २ मे रोजी भाजपला सरकार स्थापन करू द्या. प्रत्येक निर्वासीतांची गळाभेट घेऊन त्यांना नागरिकता देण्याचं काम भाजप करेल," असंही त्यांनी नमूग केलं. यापूर्वी बर्धमान जिल्ह्यातील आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यानही त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला होता. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस