शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 8:35 PM

Mamata Banerjee : यापूर्वी 'काका-छीछी' च्या घोषणा आणि भाजपाचे नेते जेपी नड्डा यांना 'चड्डा, नड्डा, फड्डा' असं म्हटलेलं वक्तव्य झालं होतं व्हायरल

ठळक मुद्देरॅलीदरम्यान भाजपवर साधला निशाणापक्ष सोडून जाणाऱ्यांची ममता बॅनर्जींकडून मीर जाफरशी तुलना

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमध्ये आपला जम बसवू पाहणाऱ्या भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील आक्रमक झाल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मंगळवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. या भाषणातील एक भाग मोठ्या प्रमाणात व्हायर होत आहे. यामध्ये त्या 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा' असं म्हणतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याचे मीम्सही तयार केलेत.यापूर्वी सीएएचा विरोध करताना ममता बॅनर्जी यांनी 'काका-छीछी' च्या घोषणा आणि भाजपाचे नेते जेपी नड्डा यांना 'चड्डा, नड्डा, फड्डा' असं म्हटलेलं वक्तव्य व्हायरल झालं होतं.ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित केलेल्या रॅलीमध्ये भाजपावर जोरदार निशाणा साधला. तसंच यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणाऱ्यांवर निशाणा साधत त्यांची तुलना मीर जाफरशी केली. "सिराजुदौलानं मीर जाफरला आपला मुकुट देऊन देशाची रक्षा करण्यास सांगितलं होतं. परंतु तो इंग्रजांसोबत सामील झाला आणि देशासोबत गद्दारी केली. काही लोकं मीर जाफर प्रमाणेच पक्ष सोडून भाजपत गेले आहेत आणि ते आता खुप आरडाओरड करत आहेत 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा, तुबां-तुबां, बंबा-बंबा' करत आहेत," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.  "ज्यांना पकडले जाण्याची भीती होती तेच भाजपमध्ये गेले आहे. भाजप एक वॉशिंगमशीन आहे. त्यात लोकं काळी होऊन जातात आणि पांढरी होऊन बाहेर येतात. हा पक्ष बंगालचा नाही. हा पक्ष दिल्लीचा आहे. दिल्लीत दंगे करणारा हा पक्ष आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशात दंगे करणारा हा पक्ष आहे. आसाममध्ये एनआरसी करणारा हा पक्ष आहे. हा पक्ष ना हिंदूंचा आहे ना मुस्लीमांचा, ना शीखांचा आहे ना ख्रिस्ती नागरिकांचा ना जैन लोकांचा," असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालSocial Mediaसोशल मीडियाBJPभाजपाElectionनिवडणूक