शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये मतदानवाढीचा फायदा कुणाला? होताहेत दावे-प्रतिदावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:58 IST

West Bengal Assembly Elections 2021 :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे राजकीय पंडितांकडून विविध कयास लावण्यात येत आहेत.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे राजकीय पंडितांकडून विविध कयास लावण्यात येत आहेत. (West Bengal Assembly Elections 2021 )दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस व भाजपाकडून मतदानवाढीचा फायदा आपल्यालाच होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा नेमका फायदा कुणाला होईल व पुढील सात फेऱ्यांवर त्याचा काय परिणाम होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Who benefits from the increase in turnout in West Bengal? There are counter-claims)पहिल्या टप्प्यातील ३० जागांपैकी २६ वर भाजपाचा विजय होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहा यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी असा दावा कसा काय करण्यात येतो हे कोडेच आहे. त्यांनी सर्वच ३० जागांवर विजयाचा दावा का नाही केला. उर्वरित जागा कॉंग्रेस व माकपासाठी सोडल्या आहेत का असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला. ८४ टक्के मतदान झाले असून नक्कीच लोकांनी आमच्या बाजूने मतदान केले आहे. आम्ही कुठलाही अंदाज लावणार नाही, असे ममता यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये यंदा झालेले अधिकचे मतदान हा सत्ताधाऱ्यांविरुद्ध कौल असू शकतो, असा एकमत प्रवाह आहे. तर ममता बॅनर्जी यांना झालेल्या अपघातानंतर त्यांना पुन्हा समर्थन मिळत आहे, असाही दावा होत आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा