शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

West Bengal Assembly Elections 2021 : "हाथरसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली, त्यावेळी अमित शहा गप्प का होते?", ममतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:56 AM

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Amit Shah : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राममध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021) पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान झाल्याचे पाहायला मिळले. यानंतर पुन्हा एकदा प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज नंदीग्राममध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या आईच्या निधनावर बोलत त्यांनी महिलांवरील हिंसेला समर्थन करत नसल्याचं सांगितलं आहे. 

महिलेच्या मृत्युचं खरं कारण माहीत नसल्याचंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर (Amit Shah) जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाशासित राज्य उत्तर प्रदेशमध्ये तरुणीवर अत्यावर करून तिची हत्या केली गेली. त्यावेळी अमित शहा का गप्प होते?, असा बोचरा सवाल ममता यांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात गेल्या महिन्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या आईला मारहाण केली होती. यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

"मी बहिणी आणि मातांवरील हिंसाचाराचे समर्थन केलेलं नाही"

ममता बॅनर्जींनी यावर नंदीग्राममधील जाहीरसभेतून स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला हे आपल्याला माहिती नाही. पण आम्ही महिलांवरील हिंसाचाराचे समर्थन करत नाही. मी बहिणी आणि मातांवरील हिंसाचाराचे समर्थन केलेलं नाही असं म्हटलं आहे. भाजपा या मुद्द्यावरून आता राजकारण करत आहे. बंगालमध्ये किती बिकट स्थिती आहे असं अमित शहा ट्वीट करत आहेत. पण उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जेव्हा एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली त्यावेळी अमित शहा गप्प का होते?, असा प्रश्न ममतांनी आता विचारला आहे. 

"राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्था ही निवडणूक आयोगाच्या हाती आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे" असा आरोप देखील ममतांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रॅलीदरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला होता. यानंतर ते आता जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. भाजपाने आपल्या उमेदवारांची शेवटची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये मिथुन यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नव्हता. मात्र त्यानंतर आता मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे. 

"मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार"

पक्षाने आता काय तो निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. तसेच मोदींनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. मिथुन चक्रवर्ती हे भाजपाचे स्टार कँपेनर आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत" असं म्हटलं आहे. भाजपाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे या पदासाठी मिथुन चक्रवर्ती  इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शो ला मोठी गर्दी होत आहे. या गर्दीतून लोकांचं पंतप्रधान मोदींवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. त्यामुळे बंगालमध्ये बदल घडू शकतो असा अंदाज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालAmit Shahअमित शहाBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेश