शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडायलाही भाजपला संघर्ष करावा लागेल; निवडणूक रणनीतीकाराचा दावा

By कुणाल गवाणकर | Updated: December 21, 2020 12:43 IST

west bengal assembly election: पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं; भाजपनं जोर लावल्यानं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहांनी नुकताच राज्याचा दौरा केला. या दरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.एका बाजूला भाजपनं विधानसभेसाठी आक्रमकपणे तयारी सुरू असताना निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. 'पश्चिम बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडताना भाजपला संघर्ष करावा लागेल. भाजपचं समर्थन करणारा माध्यमांमधला गट त्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत आहे,' असं प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझं ट्विट सेव्ह करून ठेवा. भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन, असंदेखील किशोर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. प्रशांत किशोर यांच्या ट्विटला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून किशोर यांना खोचक टोला लगावला आहे. 'पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी सुरू आहे. सत्तांतर झाल्यावर देश एका निवडणूक रणनीतीकाराला मुकेल,' अशा शब्दांत विजयवर्गीय यांनी पलटवार केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलनं प्रशांत किशोर यांच्याशी करार केला आहे. प्रशांत किशोर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत सक्रियपणे काम करत आहेत. मात्र तृणमूलचे अनेक वरिष्ठ नेते किशोर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. पक्ष सोडलेल्या अनेक नेत्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. प्रशांत किशोर आपल्या कामात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत असल्याचा या नेत्यांनी नोंदवला आहे.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोर