West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:41 PM2021-03-20T16:41:24+5:302021-03-20T16:43:49+5:30

West Bengal Assembly Election 2021: एकट्या ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी भाजपनं पूर्ण सत्ता मैदानात उतरवली; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

West Bengal Assembly Election 2021 tmc will retain power bjp will get more seats predicts shiv sena mp sanjay raut | West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'

Next

नाशिक: एका महिलेचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण सत्ता कामाला लावली आहे. या संघर्षात आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलानंदेखील असाच निर्णय घेतला आहे, असं राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shiv Sena MP Sanjay Raut on West Bengal Assembly Election 2021)

'NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?'

सध्या पश्चिम बंगालमध्ये महाभारत घडत आहे. एकट्या ममता बॅनर्जींविरोधात भाजपनं संपूर्ण सत्ता मैदानात उतरवली आहे. एका महिलेचा पराभव करण्यासाठी संपूर्ण सरकार मैदानात आहे. पण ममता बॅनर्जी सत्ता राखतील असा विश्वास वाटतो. भाजपच्या जागा वाढतील. पण त्यांना बहुमत मिळणार नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सत्ता राखण्यात यश येईल, असं राऊत यांनी सांगितलं.

“हमाम में सब नंगे होते है”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) काही दिवसांपूर्वीच आपल्या हाती घेतला. यानंतर आता कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासदेखील एनआयएकडे देण्यात आला आहे. त्याबद्दल बोलताना एनआयएनं घाईघाईनं तपास हाती घेण्याची गरज नव्हती. मुंबई पोलीस दल तपास करण्यास सक्षम आहे. पण विरोधी पक्षाचं सरकार राज्यात असल्यानं केंद्राकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत असल्याचं राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न दिसणार नाही. नाशकात पुढील वर्षी महापालिका निवडणूक होणार आहे. इथे आघाडी असो वा नसो महापौर शिवसेनेचात होणार आणि महापालिकेवर भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं नेतृत्त्व करावं याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. संपुआच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आतापर्यंत सोनिया गांधींनी उत्तमपणे सांभाळली. मात्र आता प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना सक्रिय राहता येत नाही. त्यांच्या जागी पवारांनी नेतृत्त्व हाती घ्यावं. ते विरोधकांचं नेतृत्त्व सक्षमपणे करू शकतात, असं राऊतांनी म्हटलं.

Web Title: West Bengal Assembly Election 2021 tmc will retain power bjp will get more seats predicts shiv sena mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.