'NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:07 AM2021-03-19T10:07:43+5:302021-03-19T10:07:56+5:30

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून एनआयएन आणि केंद्र सरकावरला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपा नेत्यांना मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं जरा जास्तच दु:ख झाल्याचंही अग्रलेखात म्हटलंय.

'What did the NIA investigate the attack on Uri, Pathankot and Pulwama?' shiv sena qurestioned | 'NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?'

'NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?'

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून एनआयएन आणि केंद्र सरकावरला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपा नेत्यांना मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं जरा जास्तच दु:ख झाल्याचंही अग्रलेखात म्हटलंय.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओतील जिलेटीन कांड्यांमुळे राज्याच्या राजकारणात अनेक स्फोट घडले आहेत. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुनही भाजपानेही सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरले आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. तर, या घनटेचा तपास एनआयएने आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यावरुन शिवसेनेनं एनआयएला अनेक सवाल विचारले आहेत. तसेच, मुंबई पोलिसांच खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही शिवसेनेनं केलाय. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून एनआयएन आणि केंद्र सरकावरला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपा नेत्यांना मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं जरा जास्तच दु:ख झाल्याचंही अग्रलेखात म्हटलंय. 'मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास हाती घेतला. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा. गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच समोर येईल. कोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एनआयए’ने घुसावे हा काय प्रकार आहे? मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे,' असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

दहशतवादासंदर्भातील घटनांचा तपास एनआयएनकडून होत असतो, पण या जिलेटीनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या एनआयएने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते संशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली? हेही रहस्यच आहे, असे शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलंय. 

दरम्यान, सचिन वाझे यांच्या मागचा सूत्रधार शोधण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयएनं करावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केलीय. शिवसेनेनं 'सामना'तून फडणवीसांच्या या मागणीचा समाचार घेतला आहे. तसेच, 'एनआयए'च्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

परमबीरसिंग नाराज
अचानक  त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्याने नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते. गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत  होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फोटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे  परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. आयुक्तपदावरुन त्यांची  उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली केल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Read in English

Web Title: 'What did the NIA investigate the attack on Uri, Pathankot and Pulwama?' shiv sena qurestioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.