शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल; काँग्रेस नेत्याचं पत्र ठरतंय चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 17:09 IST

west bengal assembly election 2021: पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका; शरद पवारांना काँग्रेसचं आवाहन

नवी दिल्ली/कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. राजकीय सभा, आरोप-प्रत्यारोप यांच्यामुळे वातावरण तापलं आहे. राज्यात सत्ताबदल घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसमोर आव्हान उभं राहिलं आहे. तृणमूलनं स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता राजकीय गुंतागुंत वाढली आहे.मुख्यमंत्र्यांच्या खास माणसावर शरद पवार नाराज; गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रारपश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल आणि काँग्रेस-डावे अशी तिहेरी लढत होत आहे. शरद पवारांनी यापैकी तृणमूलच्या बाजूनं उभं राहण्याची गरज व्यक्त केली. यानंतर काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना पत्र लिहिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करू नका, असं आवाहन त्यांनी पत्रात केलं आहे. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास मतदारांचा गोंधळ होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करणं टाळा, असं भट्टाचार्य यांनी पत्रात नमूद केलं आहे. न्यूज१८ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.शरद पवारांच्या 'या' पॉवरबाज खेळीने काँग्रेसच विरोधकांपासून वेगळी पडण्याची शक्यता...काय म्हणाले होते शरद पवार?देशात तिसरी आघाडी तयार करण्याबद्दलचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. 'देशात तिसरी आघाडी तयार करण्याची गरज आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांशी बोलणी सुरू आहे,' असं पवार म्हणाले होते. आपल्या भूमिकेला सीपीआयएमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी पाठिंबा दिल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं.पश्चिम बंगाल निवडणूक, ममता बॅनर्जींबद्दल काय बोलले होते पवार?पश्चिम बंगालसारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्त्वाकडून सुरू असलेले हल्ले पाहता लोकशाहीचा आदर करणाऱ्या कोणत्याही पक्षानं ममता बॅनर्जींना पाठिंबा द्यायला हवा, असं विधान पवारांनी केलं होतं. यानंतर लगेचच पश्चिम बंगालमधल्या काँग्रेस नेत्यानं पवारांना पत्र पाठवलं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढणाऱ्या ममतांना समर्थन आणि महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत वाटेकरी, अशी भूमिका घेऊ नका, असा अप्रत्यक्ष इशारा काँग्रेसनं पवारांना दिल्याचं बोललं जात आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Sharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस