शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात एका मिशनवर आलोय; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना इशारावजा संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 17:16 IST

Chandrakant Patil in Pune: चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले. तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपाला पुणेकर भेटला नाही का असाही प्रचार केला गेला.

पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करताच दुसऱ्या दिवशी त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, असा सवाल विचारला होता. यावर चंद्रकांत पाटलांनी, हुरळून जाऊ नका, पक्षाने एका मिशनवर पाठवले आहे, असा टोला हाणला आहे. 

पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यातील सेफ मतदारसंघ निवडल्याच्या आरोपांना नेहमी सामोरे जावे लागते. यामुळे पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्षच मी कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले. तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपाला पुणेकर भेटला नाही का असाही प्रचार केला गेला. या निवडणुकीत पाटील विजयी झाले असले तरीही त्यांच्यामागे परक्याचा शिक्का कायमचा लागला आहे. यावर पाटील यांनी मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य देखील केले होते. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये. मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असे पाटील म्हणाले. माझ्या पक्षाने मला एक मिशन दिलं होते. त्यामुळे मी इथे आलो. मिशन पूर्ण झाले की परत कोल्हापूरला जाणार. हे मिशन काय आहे हे तुम्हाला कशाला सांगू? असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. विरोधक बाहेरचे आहेत. त्यांना माझं मिशन दिसत नाही, दिसणार नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पुण्यातून गेलेले बरे असे त्यांना वाटते, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला. 

माझी बॅग भरलेलीच आहे. आम्हाला पक्ष सांगेल त्या ठिकाणी जावे लागते. मी राज्याचा अध्यक्ष आहे. मला एखाद्या जिल्ह्याचा किंवा भागाचा विचार करता येत नाही. त्यामुळे मी पुण्यात राहिलो काय? कोल्हापूरला किंवा नागपुरात राहिलो काय? काहीच फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.  

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे