शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

तोडफोड ते थपडा अन् झापडा, शिवसेना-भाजपात शाब्दिक राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 7:18 AM

Shiv Sena Vs BJP: शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील कटुतेला गेल्या दोन दिवसात शाब्दिक राड्याचे स्वरूप आले आहे.

मुंबई/नागपूर : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील कटुतेला गेल्या दोन दिवसात शाब्दिक राड्याचे स्वरूप आले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर रविवारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आम्हाला थप्पड मारण्याची धमकी देऊ नका. अशी एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आणि आलं तर सोडत नाही, अशी आव्हानाची भाषा वापरली.

थपडा घेत आणि देतच शिवसेनेचा इथवरचा प्रवास झाला आहे. जितक्या थपडा खाल्ल्या त्याच्या दामदुप्पट दिल्या आहेत आणि याच्यापुढेसुद्धा देऊ, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी वरळी येथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात दिला. शिवसेनेच्या रक्तातच लढवय्येपणाचा गुण आहे. इथे भाषणात साधा विषय  काढला तर घोषणा आल्या, आवाज घुमला. त्यामुळे थपडा किंवा धमकीची भाषा कोणी करू नये, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा करणे दुर्दैवी - दरेकरउद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विरोधकांनी टीका केली असली तरी मुख्यमंत्र्यांकडून थप्पडबाजीची भाषा होणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे यापेक्षा महाराष्ट्रासाठी दुर्दैवी काही नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी सांगितले. 

नशामुक्ती कार्यक्रम घेणे गरजेचे - संजय राऊतमहाराष्ट्रात तातडीने नशामुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसे समजणार, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवर दिली आहे. आमदार लाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता अशा वक्तव्यावर आमचे शाखाप्रमुखच बोलतील, असेही राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

 तुमचे काय-काय फोडू ते पाहाच! - गुलाबराव पाटीलप्रसाद लाड यांनी आम्हाला तारीख कळवावी व सेना  भवन फोडण्याची हिंमत करून दाखवावी. आम्ही त्यांचे  काय-काय फोडू शकतो, हे त्यांना लक्षात आणून देऊ, असे थेट आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले, परंतु तसे होत नसल्याने आता काहीही करून वातावरण तापवण्याचा हा प्रकार आता भाजपकडून सुरू आहे.    

माझ्यासाठी विषय संपला - प्रसाद लाडबाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो. शिवसेना भवनाबद्दल बोलणे हे चुकीचेच झाले. पण, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. कालच मी व्हिडीओद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी पुन्हा स्पष्ट केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrasad Ladप्रसाद लाडPoliticsराजकारण