शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकाकडून मारहाण, व्हिडीओ शेअर करत भाजपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 16:50 IST

Shiv Bhojan News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या योजनेचा लाभ लाखो लोकांना होत आहे.

मुंबई - गोरगरीबांच्या एकवेळच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाती घेताच शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात शिवभोजन (Shiva bhojan) थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या योजनेचा लाभ लाखो लोकांना होत आहे. मात्र शिवभोजन घेण्यासाठी केंद्रावर गेलेल्या एका वृद्ध महिलेला केंद्रचालकाकडून मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. (A woman who went to get Shiva bhojan was beaten by the center manager, Video shared by BJP)

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील एक ट्विट रिट्विट करून शेअर केले आहे. हा व्हिडीओ आशिष मेरखेड यांनी शेअर केलेला असून त्यामध्ये शिवभोजन केंद्रावर झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर एका महिलेला हाकलून लावण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ नांदेड बसस्थानकाजवळ असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या शिवभोजन केंद्रातील असल्याचा दावा आशिष मेरखेड यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. 

प्रकारारावर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, शिवभोजन घ्यायला गेलेल्या वृद्धेला मारहाण झाली आहे. हे असे मिळतेय गरिबांना 'शिवभोजन'. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन महाराष्ट्रात टक्केवारी सेनेची अशी वाटमारी सुरू आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला. 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा