Video: Blast tomorrow!; Sanjay Raut released Promo of Uddhav Thackeray's interview | Video: महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? उद्या धमाका!; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज

Video: महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? उद्या धमाका!; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आले आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  'अभिनंदन मुलाखत' सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो त्यांनी आज रिलीज करत 'उद्या धमाका' असे लिहिले आहे. 


या मुलाखतीमध्ये नेमके काय असणार, मुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. 44 सेकंदांचा हा प्रोमो आहे. 


कसं वाटतं आपल्याला?...मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? तुमच्या जिवनात वर्षभरात काय बदल झाले? असे प्रश्न या प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहेत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षपूर्तीचा कामांचा अहवाल लोकांपुढे लवकरच ठेवला जाईल असे सांगितले होते. तो अहवाल याच मुलाखतीतून मुख्यमंत्री मांडणार तर नाहीत ना, अशी उत्सुकताही अनेकांना लागली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपाने टीका केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची तक्रार केली होती. महाविकास आघाडीविरोधात भाजपा नेत्यांच्या चाललेल्या कुरघोड्या, त्यांना हात धुन्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा आदी या मुलाखतीचा मूळ भाग असण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Video: Blast tomorrow!; Sanjay Raut released Promo of Uddhav Thackeray's interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.