शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने केली शिविगाळ, मारायलाही धावले; तृणमूलच्या खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 3:15 PM

Politics News: तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेमध्ये आपल्याला शिविगाळ करून धमकावले. तसेच मारहाण करण्याचाही प्रयत्न केला असा आरोप शांतनू सेन यांनी केला आहे. दरम्यान, शांतनू सेन (Shantanu Sen) यांना सभागृहात केलेल्या गैरवर्तनाप्रकरणी राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. (Union Minister Hardeep Singh Puri insulted and even ran to beat; Serious allegations by Trinamool Congress MP Shantanu Sen.)

निलंबनाची कारवाई झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शांतनू सेन यांनी सांगितले की, राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर हरदीप पुरी यांनी माझ्याशी बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. तरीही मी त्यांच्या जवळ गेलो. तिथे जाताच त्यांनी मला धमकावण्यास सुरुवात केली. ते मला शिविगाळ करत होते. तसेच मला मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी मला घेरले होते. मात्र सुदैवाने माझ्या सहकाऱ्यांनी मला वाचवले, त्यासाठी मी देवाचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

माहिती तंत्रज्ञान आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव हे इस्राईली स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या करण्यात आलेल्या तथाकथित हेरगिरीबाबत सभागृहात उत्तर देत होते. त्याचवेळी तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधा पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातून कागद काढून घेत ते फाडून टाकले. त्यानंतर वैष्णव यांनी आपल्या उत्तराची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली.       

 

दरम्यान, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी झालेल्या या घटनेचा उल्लेख केला. तसेच हा प्रकार अशोभनीय असल्याचे सांगितले. त्यामुळे सभागृहाच्या गरिमेला धक्का बसल्याचे सांगितले. त्यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी शांतनू सेन यांना पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सभापतींनी सेन यांच्या निलंबनाची घोषणा करत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले होते. 

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण