शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 15:55 IST

Manmohan Singh on Narendra modi government : कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं

ठळक मुद्देमार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलंमोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा मनमोहन सिंग यांचा आरोप

देशात सातत्यानं बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असल्याचं म्हणत काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता असा पुनरुच्चारही केला. भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतल्या गेलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तसंच असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे, असं ते म्हणाले. तसंच मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी यावेळी केला. केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाचं उद्घाटनं करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य केलं. "सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो," असं ते म्हणाले. "देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळलं आहे. हे संकट २०१६ मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उद्भवलं आहे," असंही त्यांनी नमूद केलं. "संघटना आणि राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणे, ही भारताची आर्थिक आणि राजकीय आधारभूत संस्था आहे आणि घटनेत याबद्दल लिहिण्यात आलं आहे. परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नाही," असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी केरळच्या विकासावर भाष्य केलं. तसंच भविष्यात या ठिकाणी अन्य पर्यायांवरही लक्ष देणं आवश्यक असल्याचं म्हटलं. बाधा पार करून पुढे जायचंय"या ठिकाणी अनेक बाधा आहेत. यातून राज्याला पुढे न्यायाचं आहे. डिजिटल प्रणालीमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र काम करू शकत आहे. परंतु पर्यटन क्षेत्राला कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका बसला आहे. शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोकं देशात आणि जगातील अन्य भागांमध्ये नोकरी मिळवण्यास सक्षम झाले आहेत," असंही मनमोहन सिंग म्हणाले. 

टॅग्स :IndiaभारतDemonetisationनिश्चलनीकरणprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगKeralaकेरळ