शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: मुख्यमंत्र्यांचा आदेश, खासदार संजय राऊत आज गाझीपूर बॉर्डरवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 08:52 IST

Sanjay Raut will visit Farmer Protest gazipur border : मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले.  

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यसभा खासदार संजय राऊत आज आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार आहेत. 

याची माहिती राऊत यांनीच ट्वीट करून दिली आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले.  शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील शेतकरी आंदोलकांना भेटणार असल्याचे ट्विट राऊत यांनी केले आहे. यानंतर काही वेळातच राऊत यांनी आज गाझीपूरच्या शेतकऱ्यांना दुपारी 1 वाजता भेटणार असल्याचे ट्विट केले. 

 

शेतकऱ्यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरुय का? संजय राऊतांनी व्यक्त केला संशयकेंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेचा पहिले राऊंड, दुसरे राऊंड असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का? आशियाई गेम सुरु आहे का, खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. गेल्या ६० दिवसांपासून पंजाब. हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारताना संशयही व्यक्त केला आहे. पहिल्या राऊंडमध्येच न्याय मिळायला हवा होता. मला असे वाटतेय की यामागे एक अदृष्य शक्ती आहे. जिला देशातील वातावरण बिघडवायचे आहे. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला.  भाजपाने तेव्हाच निर्णय घेतला असता तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. परंतू प्रजासत्ताक दिनापर्यंत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव आहे. केंद्र सरकारला पुढे ते करावेच लागणार आहे, असे राऊत काही दिवसांपर्यंत म्हणाले होते. तकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. मैलोनमेैल पायपीट करून ते दिल्लीत, मुंबईत पोहोचलेत. भाजपाचे लोक आतूनच गुदमरले आहेत. प्रमुख लोकांनाही वाटतेय की प्रश्न सुटावा, असे राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्ली